Pokala
₹ 40 / Piece
₹ 50
20%
पोकळा ही तांदुळजा, माठ आणि राजगिरायांच्याशी साधर्म्य असणारी एक पालेभाजी आहे.काही भागात याला पोकळी या नावाने ओळखतात.पोकळा प्रामुख्याने खान्देशातील धुळे नंदुरबार आणि जळगाव तसेच कोल्हापूर या ठिकाणी आढळतो. हिरवा पोकळा व तांबडा पोकळा असे या पालेभाजीचे दोन प्रकार आहेत. तांबड्या प्रकारच्या भाजीची पाने काळसर लाल व लांब देठाची असतात.पोकळा या क्षुपाची उंची २०-३० सेंमी. असते. खोड प्रथम मऊ परंतु नंतर काहीसे कठीण होते. पाने एकाआड एक, साधी व लांब चमच्यांसारखी असून त्यांवर तांबड्या रेषा असतात. फुले लांब मंजिरीत येतात. ती शुष्क, लहान व द्विलिंगी असून परिदले हिरवट-पांढरी व संयुक्त असतात. फुलांमध्ये ४-५ पुंकेसर असतात.पोकळा थंडावा देणारा,सहज पचनारा भूक वाढविणारा व त्रिदोशनाशक आहे. याच्या बिया भाजून खातात. या वनस्पतीत १०० ग्रॅम मध्ये २.९ ग्रॅम प्रथिने व १८.१८ मिग्रॅ. लोह असते.
Reviews and Ratings
No Customer Reviews
Share your thoughts with other customers